पायी रुतल्या काट्यात ये
पायी रुतल्या काट्यात ये माझ्या कवितेत जशे शब्द येतात तशी तू माझ्या आयुष्यात ये बनून एखादी रेख भाग्याची निदान माझ्या भविष्यात ये काय आखायचे ते आख डाव पण एकदा माझ्या वाटयात ये मलम जखमेवरचा नाही निदान पायी रुतल्या काटयात ये तुझ्या शिवाय जगणं म्हणजे जिवंतपणी स्मशान आहे इतकं कठोर काळीज तुझं असं कसं पाषाण आहे दगड-धोंडयात सुद्धा सखे झरे फुटताना पाहिलेत मी याच आशेत तुला स्मरून कित्येकदा फुले आसवांचे वाहिलेत मी आता माझ्या हाती ना उरले हुंदक्यांची कशी समजूत काढू ? तुझ्या आठवणींचे वार परतवण्यास अस्त्र कोणते मजबूत काढू ? अस्तित्वाची जाण असून सुद्धा मन पुन्हा पुन्हा फसतं एक व्यक्ती आयुष्य नसतं पण एका व्यक्तीत आयुष्य असतं कवी:✍प्रतिक_कांबळे(कविराज) उस्मानाबाद ७०६६१३६४७५ kamblepratik580@gmail.com