Posts

हत्या वायफळ गेली

                🗡️"ह त्या वायफळ गेली"🪓 अश्याच एका रात्री घरी परतत होतो. चार-दोन गुंडांनी अचानक अडवलं, चार-दोन लाथा घालत वाट्टेल तसं तुडवलं. माझे हात तोडण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. कदाचित त्यांना माझ्या लिखाणाची भीती वाटत असावी. पण, मी तरीही विव्हळो नाही. माझ्या होत असलेल्या सन्मानाचा मी पुरेपूर आनंद घेत होतो. 'वाचवा', 'वाचवा' म्हणता आलं असतं, पण तरीही शांत राहिलो. सुस्तावलेल्या दुनियेपर्यंत लेखकांचे आवाज कुठे पोहचतात म्हणा आजकाल ,या विचाराने.   हात सोडले गुंडांनी आणि पिस्तुल काढली. ज्या हाताने मी माझी कलम चालवायचो ते हात तोडता आले नसावेत त्यांना कदाचित.    पिस्तुलीतल्या गोळ्यांनी माझ्या उभ्या देहाची चाळन करून ते निघून गेले. त्यांनी त्यांचं काम चोख बजावलं होतं. पण एक चूक वगळता , माझं सांडलेलं रक्त त्यांनी पुसून टाकलं नाही आणि त्यांच्या याच चुकीमुळे त्यांना नको असणारी वैचारिक क्रांती पुन्हा जन्मास आली.  त्यामुळे त्यांनी माझी केलेली हत्या अगदी वायफळ गेली  ...........  ======================= कवी: ©️®️ प्रतिक_कांब...

भूक

Image
                      भूक   घनदाट जंगलात पेटलेल्या वणव्यापेक्षा जास्त भयानक असते पोटात पडलेली भूकेची आग  उद्याचा सूर्य आपल्या पदरात काही पाडणार हे ठाऊक असून सुद्धा आलेली जाग,भयानक असते भूक भागण्यापूरताच असलेला संघर्ष क्षुल्लक असला तरी सोपा नक्कीच नसतो  जगण्यासाठी माणूस सदा, किती डाव रचतो ?  सूर्य गिळून आणि चंद्र पिऊन शमली असती भूक कायमची, तर किती बरं झालं असतं  खोट्या विकासात आणि सडक्या आधुनिकतेत रमली असती भूक, तर किती बरं झालं असतं भूकेमुळे जीव जातो आणि भूकेसाठी जीव घेतला जातो स्वातंत्र्याचा अनेक सालानंतर सुद्धा 'गरीब' इथला पिचला जातो टरकन पोट फाडु वाटतं असलं तरी  फाडायची हिम्मत होत नाही ताटात यावा घास अशी  साली कधीच गंमत होत नाही एकीकडे सरता सरणार नाही इतकी रास धनाची, धान्याची  मानसिकता त्यांची पण कुजक्या मनाची  सढळ हात, हात राखून येतात पुढे ज्यांच्यामुळे वाचू शकतात, भूक भागली नाही म्हणून पडत असलेले मडे सहानभूतीच्या दृष्टीक्षेपात यायला हवी यातना त्यांची, याचना 'त्यांची' जगण्यासाठीची...

पायी रुतल्या काट्यात ये

                  पायी रुतल्या काट्यात ये  माझ्या कवितेत जशे शब्द येतात तशी तू माझ्या आयुष्यात ये बनून एखादी रेख भाग्याची निदान माझ्या भविष्यात ये काय आखायचे ते आख डाव पण एकदा माझ्या वाटयात ये मलम जखमेवरचा नाही निदान पायी रुतल्या काटयात ये  तुझ्या शिवाय जगणं म्हणजे जिवंतपणी स्मशान आहे इतकं कठोर काळीज तुझं असं कसं पाषाण आहे दगड-धोंडयात सुद्धा सखे झरे फुटताना पाहिलेत मी  याच आशेत तुला स्मरून कित्येकदा फुले आसवांचे वाहिलेत मी  आता माझ्या हाती ना उरले हुंदक्यांची कशी समजूत काढू ? तुझ्या आठवणींचे वार परतवण्यास अस्त्र कोणते मजबूत काढू ? अस्तित्वाची जाण असून सुद्धा मन पुन्हा पुन्हा फसतं एक व्यक्ती आयुष्य नसतं पण एका व्यक्तीत आयुष्य असतं  कवी:✍प्रतिक_कांबळे(कविराज) उस्मानाबाद  ७०६६१३६४७५       kamblepratik580@gmail.com